बारावी परीक्षेला आजपासून सुरुवात; विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट

students

पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा आजपासून सुरु होत आहे. राज्यभरात एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. परिक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी 273 भरारी पथकांची नजर परीक्षा केंद्रांवर असणार आहे. परीक्षेसंदर्भात संपूर्ण तयारी झाल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.

परीक्षेसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १३ हजारांनी वाढली आहे. विद्यार्थ्यांना वेळेआधी अर्धा तास परीक्षा कक्षात पोहोचणे आवश्यक असून, अकरा वाजेपर्यंतच कक्षात प्रवेश दिला जाणार आहे.

Loading...

तसेच यावर्षीच्या परीक्षेचं वैशिष्ट्य म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा आराखडा बदललेला आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मंडळाने हेल्पलाईन क्रमांकही जारी केले आहेत. शिवाय दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विभागीय मंडळामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

दरम्यान, १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत परीक्षा होईल. परीक्षेसाठी राज्यभरात यंत्रणा सज्ज झाली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका