‘महाराष्ट्र बंद’ डोणजे गावात ठिय्या आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज संपूर्ण राज्यात बंद चे आवाहन करण्यात आले आहे. याच बंदचा भाग म्हणून डोणजे गावात ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. सकाळपासूनच या बंदला जोरात प्रतिसाद मिळत असून दुकानदारांंनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत.

भारतीय जनता पक्षाने फसवल्याची भावना यामधून दिसून येत आहे. सरकारने वारंवार लोकांची दिशाभूल केली आहे अन मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने खोटी याविरोधात लोक संतप्त आहेत.

दरम्यान मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मागील 15 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येत आहे. औरंगाबाद येथील मराठा युवक काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतल्यानंतर हे आंदोलन अधिकच तीव्र झाले आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला जात आहे.

सकाळी 11 वाजल्यापासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

मराठा आरक्षण : आज पुण्यात अभिनव स्टंट आंदोलन