‘महाराष्ट्र बंद’ : भररस्त्यात जागरण गोंधळ, भारूड आणि सत्यनारायणाची महापूजा

टीम महाराष्ट्र देशा – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राहुरीच्या नगर मनमाड राज्य मार्गावर आंदोलकांनी सत्यनारायणाची महापूजा घातली. या महापूजेनंतर भररस्त्यात जागरण गोंधळ, भारूडाचा तसेच देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम घेत चक्काजाम आंदोलन केले. सकाळी नऊ पासून आंदोलन करण्यात येत आहेत.

पुणे- मराठा आरक्षणाच्या मागणीवर आज सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे, या बंदला पुण्यामध्ये उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. मुख्य बाजापेठेसह उपनगरांतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, शहरातील सर्व समाज बांधवानी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

जालना- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (ता.9) जालना जिल्ह्यात ठीक-ठिकाणी चक्काजाम आंदोलनासह जिल्हात बंद पाळण्यात आला आहे.

जालना शहरात येणाऱ्या सर्व चौकात चक्काजाम आंदोलन सुरु करण्यात आले आहे. दरम्यान अंबड चौफुली, इंदेवाडी, भोकरदन तालुक्यातील तळेगाव, बबदनापुर तालुक्यातील चिखली येथे रोडवर टायर जाळ्यात आले.

पंढरपूर-सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला पंढरपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने संपूर्ण पंढरपूर शहर आणि तालुका कडकडीत बंद पाहायला मिळत आहे. मंदिर परिसर तसेच शहरातील प्रमुख रस्त्यावरील दुकाने बंद होती यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे हाल झाले.

नागपूर- या बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या बंदचे पडसाद बुधवारी मध्यरात्रीपासून उमटू लागले आहेत.नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहनकरण्यात आलं.

कुर्डूवाडी -सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्याात आलेल्या बंद ला कुर्डूवाडी शहर व परिसरातील सर्वच ठिकाणी कडेकोट इतिहासातील सर्वात मोठा बंद पाळण्यात आला. आज गुरुवार चा साप्ताहिक बाजार असुनही , मार्केट कमिटी , भाजीपाला व फळ विक्रेते , यांच्यासह शहरातील अत्याआवशक सेवा सोडुन कडकडित बंद पाळण्यात आला. दि. 8 रोजी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील रँली काढुन बंद चे अवाहन करण्यात आले.

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाकडून निदर्शने