fbpx

महाराष्ट्र बंद’ तणावाची संधी साधून विद्यार्थिनीचे अपहरण

school girl

श्रीरामपूर/ भागवत दाभाडे,राजेश बोरुडे : सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या भीमा-कोरेगाव प्रकरणाचे पडसाद विविध जिल्ह्यात उमटत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही विविध ठिकाणी दगडफेक करण्यात आली व बंदची हाक देण्यात आली. म्हणून श्रीरामपूर मध्ये शाळा लवकर सोडण्यात आल्या होत्या. मॉडेल इंग्लिश स्कुल मधील तिसरीत शिकणारी विद्यार्थिनी कु.श्रद्धा आदिक (८वर्ष) हि विद्यार्थिनी घरी पोहचलीच नसल्यामुळे खळबळ उडाली होती.

शाळेतील स्कुल बसने संबंधित मुलीला खानापूर येथे सोडले. शाळा लवकर सोडल्याची कल्पना शाळा प्रशासनाने पालकांना दिली नाही. त्यामुळे शाळेचा हलगर्जीपणा स्पष्ट दिसून येत आहे.तणावाच्या परिस्थितीचा फायदा घेत या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. श्रीरामपूर पोलीस स्टेशन मध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास केला असता हि मुलगी पनवेल येथे सुखरूप सापडली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.