पुणे : हजारो मराठा बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणा 

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीवर आज सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे, या बंदला पुण्यामध्ये उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. मुख्य बाजापेठेसह  उपनगरांतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, शहरातील सर्व समाज बांधवानी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मागील 15 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येत आहे. औरंगाबाद येथील मराठा युवक काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतल्यानंतर हे आंदोलन अधिकच तीव्र झाले आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला जात आहे.

सकाळी 11 वाजल्यापासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी कॉंग्रेसचे बी. के. हरिप्रसाद रिंगणात