आंबेडकरी संघटनांचा महाराष्ट्र बंद मागे- प्रकाश आंबेडकर

भीमा कोरेगाव

टीम महाराष्ट्र देशा :  देशातील काही हिंदू संघटना देशात गोंधळ निर्माण करण्यासाठीच आहेत. काही हिंदू संघटना अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत असे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषेदेत सांगितले.  भिडे, मिलिंद एकबोटे हिंसाचाराचे मुख्य सूत्रधार तसेच काही हिंदू संघटना अराजकता माजवत आहेत असे  प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रबंद मागे घेतो असे प्रकाश आंबेडकर यांनी  पत्रकार परिषदेत घोषणा केली. महाराष्ट्राची 50 टक्के जनता आजच्या महाराष्ट्रबंद मध्ये सहभागी होती असे प्रकाश आंबेडकरनी सांगितले.

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

  • जो न्याय याकूब मेमनला लावला तोच न्याय भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना लावा
  • दलित बांधवांना सणसवाडीत मारहाण झाली आहे
  • जो न्याय याकूबला, तोच भिडे, एकबोटेंना लावा
  • बंद शांततेत पार पडला

भीमा कोरेगावमधील कार्यक्रम ही सभा नव्हती, उमर खालिद आणि जिग्नेश मेवानी यांची नाव घेतली जात आहेत, पण त्यांचा याच्याशी संबंध नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर 
Loading...