‘महाराष्ट्र बंद’ला राज्यभर प्रतिसाद

भीमा कोरेगाव

टीम महाराष्ट्र देशा: भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी राज्यभरातील दलित संघटनांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे आज मुंबई, पुणे, नाशिक या प्रमुख शहरांसह राज्यभरात मोठी आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून राज्यभरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भीमा कोरेगाव हिंसाचाराचे पडसाद कालपासूनच राज्याच्या अनेक भागांमध्ये उमटायला सुरूवात झाली होती. महाराष्ट्र बंद ला हिंसक वळण लागले होते.

पुणे
येरवडा, विश्रांतवाडी दांडेकर पूल परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला .शिवापूर जवळ प्रचंड वाहतूक कोंडी पहायला मिळाली. मोर्चेकरांनी टायर जाळले. महिलांचा मोठा सहभाग होता , साताराला जाणा-या बसची हवा सोडून बस बंद पाडली.देहूरोड येथील सर्व शाळांना सुट्टया देण्यात आली होती .स्वारगेट बस स्थनाकतील प्रवाशांची संख्या कमी, नेहमी गजबलेलं स्वारगेट बसस्थानक मोकळं दिसत होतं.महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर वारजे माळवाडी परिसरात स्कूल बस, व्हॅन , रिक्षाने शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना परत पाठविले .

pune station

मुंबई
मुंबईत मध्य रेल्वेवर डोंबिवली, कांजुरमार्ग स्थानकावर तोडफोड करण्यात आली.डोंबिवली स्टेशनवरील पूर्व भागातील तिकीटघर जमावानं फोडलं. दुपारी दीड वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे.डोंबिवली स्टेशन आणि कल्याण दरम्यान पत्री पुलाजवळही लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या रोखल्या होत्या.दुसरीकडे, कांजुरमार्ग स्टेशनवर मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. 50 ते 60 जणांनी स्थानकावरील साईन बोर्ड, पोस्टर, स्टीलच्या खुर्च्या, पाणी प्यायचं मशिन, ट्यूबलाईट्स यांची तोडफोड करण्यात आली.पूर्व द्रुतगती मार्गासह ठिकठिकाणी रास्ता रोको, गोवंडी-चेंबूर येथे रेल रोको घडल्याने मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडली. आंबेडकरी जनतेचा प्रभाव असलेल्या घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, भांडुप, वरळीसह अन्य उपनगरांमधील दुकाने, व्यवहार, व्यवसाय बंद पाडण्यात आला.

परभणीत संघ कार्यालयावर दगडफेक करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

संपप्त जमावाने स्टेशनरोडवरील संघ कार्यालयावर दगडफेक करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे. शहरातील स्टेशनरोड, बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बुधवारी कोरेगाव भीमा प्रकरणामुळे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे सकाळपासूनच शहरातील बाजारपेठ बंद होत्या. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या काही घरे व दुकांनावर अज्ञात जमावाने तुफान दगडफेक केली. त्यानंतर स्टेशनरोडवरील केशव प्रेरणा या संघ कार्यालयावर अज्ञात जमावाने दगडफेक करत कार्यालयास जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात कार्यालयाची खडकी, खोलीतील गादी व पुस्तके जळाली.

2sangh

धुळे

कोरेगाव भीमाच्या घटनेच्या निषेधार्थ संविधान संरक्षण समितीतर्फे पुकारण्यात आलेल्या आजच्या बंद’ला हिंसक वळण लागले. धुळे शहरात आग्रा रोड, साक्री रोड परिसरात दुकानांवर दगडफेक करण्यात आली. शिरपूर येथे आगारात उभ्या असलेल्या दोन बसवर दगडफेक केली. समितीतर्फे पाचकंदील येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला परिवहन महामंडळानेही बस सोडणे सकाळी अकरालाच बंद केले होते.

नागपूर
संविधान चौकात तीन तास रास्तारोको केल्यानंतरही भीमसैनिकांचा संताप शांत होत नव्हता. पोलिसांना काही प्रमाणात बळाचा वापर करावा लागला. यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण होते. भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ स्वयंस्फूर्तीने कार्यकर्ते सकाळपासून संविधान चौकात एकत्र आले. दुपारी एक वाजता जसजशी गर्दी होऊ लागले तसे आंदोलनकर्त्यांनी घोषणा देणे सुरू केले.संविधान चौकात रास्तारोकोमुळे तीन तासांपेक्षा जास्त काळ वाहतूक ठप्प होती. चौकातून होणारी वाहतूक विविध मार्गांनी वळविण्यात आली. केवळ बंदूकधारी पोलिसांचा ताफा आणि आंदोलन करणारे भीमसैनिक दिसत होते. दोन हजारांवर कार्यकर्ते संविधान चौकात एकाच वेळी दाखल झाले. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलनात हजेरी लावली. उत्तर नागपुरात भीम चौक, दक्षिण नागपुरातील अजनी, आनंदनगर चौकात आंदोलन झाले. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने परिस्थिती नियंत्रणात होती.

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला बुधवारी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कोल्हापूरात आर. के. नगर नाक्यावर जमावाकडून तोडफोड करण्यात आली. तसेच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाला मारहाण करण्यात आल्याने या बंदला हिंसक वळण लागले.

चंद्रपूर
चंद्रपूरचे आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयावर बंद दरम्यान मोर्चेकऱ्यांचा हल्ला, महिला-पुरुषांनी केली कार्यालयाची तोडफोड

एसटी बसची तोडफोड
आंदोलकांनी दगडफेक करून 168 एसटी बसची मोडतोड केली. एसटीचे एक कोटी 67 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. नळदुर्गजवळ उमरगा येथून पुण्याकडे येणाऱ्या शिवशाही बसवर आंदोलकांनी दगडफेक केली. त्यात बसच्या खिडकीच्या काचा फुटल्या. औरंगाबाद शहरात 31 एसटी बसची तोडफोड करण्यात आली. मुंबईतील परळ आगारदेखील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद करण्यात आले होते.

परीक्षा पुढे ढकलल्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं आज (बुधवार) होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. एमए, एमबीए अभ्यासक्रमाचे आज पेपर होणार होते. दुसरीकडे सावित्रीबाई फुले विद्यापीठानं आजचा एम.फार्म.चा एक पेपर पुढे ढकलला आहे. ही परीक्षा पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यात होणार होती.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे तर्फे राज्यभरात सुरु असलेली शासकीय कॉम्प्युटर टायपिंग परीक्षा (जीसीसी-टीबीसी) रद्द, आज रद्द झालेली परीक्षा रविवारी (ता. ७) होणार

aurangabad vidapathat
File photo

बंद मागे
अनेक ठिकाणी तोडफोड करण्यात आली. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बंद ची घोषणा केली होती.महाराष्ट्र बंद ला हिंसक वळण लागल्यामुळे ५ वाजेपर्यंत आंदोलन मागे घेऊ असे आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषेदेत स्पष्ट केले. मंगळवारी सकाळी वस्त्यांमधून आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नगर या शहरांत दगडफेक, रास्ता रोको, तोडफोडीचे काही प्रकार घडले.