‘महाराष्ट्र ATS ची टीम दिल्लीत, जान मोहम्मदची करणार चौकशी’

ATS

मुंबई : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची टीम दिल्लीत दाखल झाली असून लवकरच संशयित दहशतवादी जान मोहम्मद शेख याची चौकशी होणार आहे. संशयित जान मोहमद याच्यावर आयएसआय एजंटच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे. जान मोहम्मद याला दिल्ली पोलिसांनी स्पेशल सेलने दोन दिवसांपूर्वी राजस्थानच्या कोटा येथून अटक केली होती.

दरम्यान जान मुंबई येथील धारावीचा रहिवासी असून त्याचे दाऊदशी २० वर्षांपासूनचे संबंध आहेत. दरम्यान दिल्ली पोलिसांच्या परवानगीनंतर महाराष्ट्र एटीएसचे अधिकारी त्याची चौकशी करणार आहेत. जान मोहम्मद शेख हा टॅक्सी चालक असून सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर झोपडपट्टी भागात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला पत्नी आणि दोन मुलीही आहेत. त्यापैकी एका मुलीने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे, तर दुसरी मुलगी शाळेत शिकते.

दरम्यान महाराष्ट्र ATS ची टीम दिल्लीत पोहोचली असून लवकरच टीम संशयित जान मोहम्मद शेखची चौकशी करणार आहे. दिल्ली पोलिसांनी ६ संशयित अतिरेक्यांना अटक केली असून या घटनेनंतर देशभरात खळबळ माजली. तर राज्यात भाजपकडून ठाकरे सरकारवर सुरक्षेबाबत अनेक प्रश्न केले गेले.

महत्त्वाच्या बातम्या