fbpx

रेड अलर्टमुळे अवघ्या १३ तासांच्या कामकाजानंतर विधिमंडळ अधिवेशनाचं सूप वाजलं

devendra fadnavis

मुंबई: भारत – पाकिस्तान संबंध ताणले गेल्याने संपूर्ण देशभरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य विधीमंडळाचे अधिवेशन गुंडाळण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई आणि राज्यामध्ये घाबरण्याची परस्थिती नाही, मात्र नागरिकांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची असल्याने अधिवेशन संस्थगित करण्यात आल्याच सरकारकडून सांगण्यात येत आहे.

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असतानाच भारत – पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये अधिवेशन सुरु असल्याने जवळपास सहा ते सात हजार पोलीस कर्मचारी एकट्या विधिमंडळ आणि आजूबाजूच्या परिसरात तैनात करण्यात येतात. मात्र सध्याची परस्थिती पाहता सुरक्षा यंत्रणेवर ताण येऊ नये, यासाठी अधिवेशन लवकर संस्थगित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

विरोधी पक्षनेते, गटनेते आणि सर्वपक्षीय बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, देशात निर्माण झालेल्या परस्थितीमध्ये सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात सांगितले. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण 13.20 तास कामकाज झाले आहे.