Exit Polls : महायुती जोमात तर महाआघाडी कोमात

blank

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. राज्यभरात आज एका टप्यात मतदान पार पाडले. काही ठिकाणी पावसाचे सावटअसल्याने मतदानाचा टक्का काहीसा घसरताना दिसला. तर शहरी भागा पेक्षा ग्रामीण भागात मतदान मोठ्या प्रमाणात झाले आहे. येत्या २४ तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदारराजाने कोणाच्या बाजूने कौल दिला आहे. हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

तत्पूर्वी काही एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलनुसार भाजप आणि शिवेसेना बहुमत मिळत असल्याच सांगण्यात येत आहे. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. टीव्ही 9 मराठीच्या एक्झिट पोलनुसार भाजपला – 123 , शिवसेनेला – 74 , राष्ट्रवादी कॉंग्रेस – 40 , कॉंग्रेस – 35 एवढ्या जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. म्हणजेच महायुतीला 197 तर महाआघाडीला 75 आणि इतरांना 16 जागा मिळतील असा अंदाज आहे.