महाराष्ट्रात मतदानाला संथ प्रतिसाद तर हरियाणामध्ये विक्रमी मतदान

टीम महाराष्ट्र देशा – आज महाराष्ट्र आणि हरियाना या राज्यांत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. राज्यात अत्यंत धीम्या गतीने मतदान होत आहे. मात्र हरियाना मध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदान केले आहे. लोकशाहीसाठी ही महत्वाची गोष्ट आहे.

दुपारी १ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ३०.०७ टक्के तर हरियाणामध्ये ३६.८७ टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाची संततधार सुरु असल्याने मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये उत्साहाची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे राज्यात फक्त ३० टक्केचं मतदान झालेले दिसत आहे.

हरियानामध्ये मात्र मतदारांनी उत्साह दाखवला आहे. येथे सरासरी ३७ टक्के मतदान झालेले आहे. राज्यात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सरकारकडून वारंवार जनजागृती करण्यात आली होती. यासाठी अनेक सामाजिक संस्था आणि सिनेकलाकारांकडून मतदानासाठी आवाहन करण्यात आले होते.

दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ तर हरियाणामध्ये ९० जागांसाठी मतदान होत आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात महत्वाची लढत होत आहे. महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीचे सरकार आहे. तसेच हरियाणामध्ये भाजपचे सरकार आहे.

महत्वाच्या बातम्या