म्हणून रस्त्यावर लघुशंका करावी लागली – राम शिंदे

टीम महाराष्ट्र देशा: राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी रस्त्याच्या कडेला उघड्यावर लघुशंका करत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवणाऱ्या सरकारचे मंत्रीच या अभियानाला केराची टोपली दाखवत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे . या प्रकरणी सारवासारव करत बार्शी दौऱ्यावर असताना मी आजारी होतो, तसेच रस्त्यावर कोठेही स्वच्छतागृह न मिळाल्याने रस्त्याच्या कडेला लघुशंका करावी लागल्याच राम शिंदे यांनी सांगितल आहे.

काय आहे प्रकरण
जलसंधारण मंत्री राम शिंदे हे बार्शी तालुक्याच्या दौऱ्यावर होते. जलयुक्त शिवार योजनेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या मळेगाव येथील कामाची त्यांनी पाहणी केली. गावातील पाहणी केल्यानंतर पुढच्या दौऱ्यासाठी ते निघाले. मात्र वाटेत एका ठिकाणी त्यांच्या गाडीचा ताफा थांबला, मंत्रीमहोदय गाडीतून बाहेर आले आणि थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या जागेवर लघुशंका करू लागले. सदर प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. संबंधित व्हिडीओमध्ये त्यांचा खाजगी रक्षक विरोध करताना देखील दिसत आहे.Loading…
Loading...