fbpx

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातचं बेकायदेशीर डान्स बार सुरु – कॉंग्रेसचा आरोप

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत असे म्हणत महाराष्ट्र कॉंग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहे. याचदरम्यान महाराष्ट्र कॉंग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहे. आणि गृहखाते स्वतःकडे ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच बेकायदेशीर डान्स बार राजरोसपणे सुरू आहेत. अशी टीका कॉंग्रेसने केली आहे.

इतकेच नव्हे तर, इतरांना चाल,चलन आणि चारित्र्याचे धडे देणारे स्वतः त्याची किती अंमलबजावणी करतात हेच यावरून दिसून येते. असा टोलाही कॉंग्रेसने लगावला. याचबरोबर, जरा लक्ष द्या मुख्यमंत्री साहेब! असे म्हणत डान्स बारवर लक्ष देण्याची मागणीही केली.