महाराजाच्या हॅटट्रिकमुळे दक्षिण अफ्रिकेची वेस्ट इंडिजवर १५८ धावांनी मात

मुंबई : सेंट लुशीया येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिजचा १५८ धावांनी पराभव केला आहे. दक्षिण अफ्रिकेने दिलेल्या ३२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ केवळ १६५ धावांची मजल मारु शकला. या सामन्यासह दक्षिण अफ्रिकेने २ कसोटी सामन्याची मालिकाही २-० अशी खिशात घातली आहे.

नाणेफेक जिंकत यजमान वेस्ट इंडिज संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण अफ्रिका संघाने पहिल्या डावात २९८ धावांची मजल मारली. क्विटंन डिकॉकने दक्षिण अफ्रिकेकडुन सर्वाधीक ९६ धावांची खेळी केली तर वेस्ट इंडिजकडून काईल मेयर आणि केमार रोच यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव १४९ धावांवर अटोपला. वेस्ट इंडिजकडुन जेर्मेन ब्लॅकवुडने सर्वाधीक ४९ धावांची खेळी केली. तर दक्षिण अफ्रिकेकडून वियान मुलदरने सर्वाधीक ३ गडी बाद केले.

यासह दक्षिण अफ्रिकेला पहिल्या डावात १४९ धावांची आघाडी मिळाली. मात्र पहिल्या डावाप्रमाणे दक्षिण अफ्रिकेचा दुसरा डाव यशस्वी नाही ठरला. केवळ १७४ धावांत दक्षिण अफ्रिकेचा संपुर्ण संघ माघारी तंबुत परतला. वॅन डर डसेनने दक्षिण अफ्रिकेकडुन सर्वाधीक ७५ धावांची नाबाद खेळी साकारली. तर वेस्ट इंडिजकडुन केमार रोचने सर्वाधीक ४ गडी बाद केले. पहिल्या डावातील १४९ धावाच्या आघाडीच्या जोरावर दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिज समोर ३२४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. सामन्याला दोन दिवसाचा अवधी बाकी होता. सामना वेस्ट इंडिजच्या घरच्या मैदानावर होत असल्याने त्यांच्याकडुन विजयाची अपेक्षा केली जात होती.

मात्र ती अपेक्षा फोल ठरली. ३२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संपुर्ण संघ १६५ धावांवर बाद झाला. यासह दक्षिण अफ्रिकेने हा सामना १५८ धावांनी जिंकला. वेस्ट इंडिजकडून सलामीवीर कायरान पॉवेलने सर्वाधीक ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर केशव महाराजाने दक्षिण अफ्रिकेकडुन सर्वाधिक ५ गडी बाद केले. या सामन्याला कलाटणी मिळाली ती ३७व्या षटकात. या षटकात महाराजाने कायरान पॉवेल(५१), जेसन होल्डर(०) आणि जोशुआ डी सिल्व्हा(०) या तीन फलंदाजाना बाद करत हॅटट्रिक नोदंवली. अष्टपैलु कामगीरीसाठी कासिगो रबाडाला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या