सोलापूरात सात परिसरात नाल्यावर विनापरवाना बांधकाम

सोलापूर : शहरातील बहुतेक ठिकाणचे गतिरोधक नियमानुसार नाहीत. त्याबाबात आढावा घेऊन गरजेचे असेल त्याठिकाणी ठेवून अन्य ठिकाणचे गतिरोधक काढण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. रस्त्यावरील ड्रेनेज चेंबरचे काम व्यवस्थित झालेले नाही. त्यामुळे अपघात होऊ शकतो. सात परिसरात नाल्यावर विनापरवाना बांधकाम झाल्याने याप्रकरणी संबंधित अभियंत्यास समज दिल्याची माहिती महापालिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी दिली. शहरात गतिरोधक आहेत, पण ते नियमानुसार नाहीत. काही ठिकाणी तर विनापरवाना गतिरोधक घातले आहेत नियमानुसार गतिरोधक टाकताना मनपा मोबालिटी कमिटीकडून मान्यता घेणे आवश्यक आहे. गरज असेल तेथे गतिरोधक आहेत. पण त्यांची परवानगी नाही, त्यास देण्यात येईल. विनापरवाना असतील तर काढून टाकण्यात येतील, असे आयुक्त म्हणाले. रस्त्यावरील ड्रेनेज चेंबरची कामे व्यवस्थित झालेली नाहीत. काही ठिकाणी रस्त्यावरील ड्रेनेज चेंबर रस्त्यापेक्षा उंच आहेत. तर काही ठिकाणी रस्त्यांच्या खाली गेले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. उंच असलेले कमी करून रस्त्याबरोबर करणे आवश्यक आहे. त्यामुळे अपघात होणार नाही, असेही ते म्हणाले.