fbpx

चैत्यभूमी वर लोटला भीमसागर !

मुंबई : महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून दादरच्या चैत्यभूमीवर अभिवादनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भीमसैनिक दाखल झाले आहेत. आज राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 62 वा महापरिनिर्वाण दिन आहे. दरम्यान आज सकाळी आठच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव, शिक्षणमंत्री विनोद तावडे चैत्यभूमीवर दाखल झाले आणि त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास, समता सैनिक दलाने पथसंचलंन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली.

अनुयायींच्या सोयीसाठी मुंबई महापालिकेने शिवाजी पार्क मैदानात त्यासाठी विशेष सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. तसेच अनुयायींना वास्तव्याची आणि जेवणाची सुविधा पुरवण्यात आली आहे. याशिवाय महापालिकेच्या सात शाळांमध्येही त्यांच्या वास्तव्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, समता सैनिक दलाचेच साडे पाच हजाराहून जास्त स्वयंसेवक, तसेच पोलीस इथे तैनात आहेत व कोणताही अनुचित प्रसंग घडू नये याची दक्षता घेत आहे.

प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करू पण एमआयएम नको – अशोक चव्हाण