‘महंत गिरी आत्महत्या करूच शकत नाहीत,त्यांची हत्याच झाली असावी’

नरेंद्र गिरी

लखनौ – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस उत्तर प्रदेश सरकारने केली आहे. नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणी संतांकडून सतत सीबीआय चौकशीची मागणी केली जात होती. अखेर उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस बुधवारी रात्री केली.दोन दिवसांपूर्वी नरेंद्र गिरी यांचा मृतदेह वाघंबरी मठात संशयास्पदरित्या आढळून आला होता.

दरम्यान, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली कथित चिठ्ठी (सुसाइड नोट) बनावट आहे. महंत गिरी आत्महत्या करूच शकत नाहीत. त्यांची हत्याच झाल्याचा दावा भाजप खासदार साक्षी महाराज यांनी केला आहे. कथित सुसाइड नोटमध्ये नरेंद्र गिरी यांनी ज्या बलवीर गिरी यांना आपला उत्तराधिकारी बनवा असे लिहिले आहे.

बलवीर यांनी आपल्या गुरूच्या हस्ताक्षरावरून दोन वेगवेगळी वक्तव्ये केली आहेत. नरेंद्र गिरींच्या कथित सुसाइड नोटमधील हस्ताक्षर हे आपल्या गुरूंचेच आहे, असे बलवीर गिरी मंगळवारी म्हणाले होते. पण आज त्यांना हस्ताक्षराबाबत विचारण्यात आले तर त्यांनी ते ओळखण्यास चक्क नकार दिला. त्यानंतर खासदार साक्षी महाराज यांनी महंत गिरी यांची हत्याच झाल्याचा दावा करीत या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या