महामुलाखत: बाळासाहेबांच्या वयाचे शरद पवार एकमेव शेवटचे नेते – राज ठाकरे

शरद पवार

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शरद पवार यांची अभूतपूर्व मुलाखत घेत आहेत. सुरवातीस राज ठाकरे म्हणाले, आज पहिल्यांदा तणाव जाणवत आहे. कारण असा प्रसंग जीवनात प्रथमच आला. तसेच बाळासाहेबांच्या माझ्या वडिलांच्या वयाचे शरद पवार हे एकमेव शेवटचा नेता असल्याचे ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांना जेव्हां मुलाखतीबदल विचारलं गेलं तेव्हा ठाकरे म्हणाले, मी महाराष्ट्राला पडलेलं प्रश्न विचारणार. तेव्हा मी हो म्हणून बसलो मात्र पुन्हा टेन्शन येऊ लागलं. मी राजकीय पक्षांचा नेता म्हणून बसलो नाही. बाळासाहेबांच्या आणि माझ्या वडिलांच्या वयाचे हा एकमेव शेवटचा नेता. माझ्यावर जनरेशन गॅपचा तणाव.

कालच मी पुण्यात आलो, मला माहित नव्हतं पवार साहेब कुठे राहतात. पुन्हा कळलं ते मोदी बागेत राहतात. दुपारी जेवायला बसल्यावर सुप्रिया सुळेंचा फोन आला. त्यांनी पेपर न फोडण्याची तंबीच दिली. त्यामुळे आज पहिल्यांदाच तणाव जाणवत आहे.