‘महाकुंभ १२ वर्षातून एकदा येतो, भव्यदिव्य पद्धतीनेच आयोजन झालं पाहिजे’

तीरथ सिंह रावत

डेहराडून : सध्या देशात अनेक राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र अद्याप देखील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे केले जात आहेत. त्यामुळे कोरोना आटोक्यात येण्यास अडथळा निर्माण होत आहे.

यामध्ये उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या तीरावर १ एप्रिलपासून कुंभमेळ्याला विधीपूर्वक सुरुवात झाली. मेळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडच्या सीमांवर, उत्तर प्रदेशच्या रुरकीतील नरसन आणि उधमसिंगनगर जिल्ह्यातील काशीपूर येथे कडक तपासणी करण्यात येत आहे. मात्र उत्तराखंड उच्च न्यायालयाने यासाठी नियम घालून दिले आहेत. ज्यांच्या आरटी-पीसीआर चाचणी अहवाल नकारात्मक आहे अशांनाच प्रवेश देण्यात येत आहे. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांचा आरटी-पीसीआर चाचणी अहवाल हा जास्तीत जास्त ७२ तासांपूर्वीचा असणे अनिवार्य आहे. तसेच करोना लसीचा पहिला डोस घेतलेल्या भाविकांसाठीही हा नियम लागू असून सर्व भाविकांनी करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.

दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी ‘महाकुंभ १२ वर्षातून एकदा येतो, दरवर्षी येत नाही. जत्रा दरवर्षी होतात आणि कुठेही होऊ शकतात. मात्र कुंभ हा हरिद्वारमध्येच होतो आणि १२ वर्षातून एकदाच होतो. हरिद्वार, बनारस आणि उज्जैनमध्येच महाकुंभ होतो. त्यामुळेच महाकुंभचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आलं पाहिजे,’ असे मत व्यक्त केलं आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या