पंकजा मुंडेच्या त्या निर्णयावर महाजन मामा म्हणतात…

टीम महाराष्ट्र देशा : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रविवारी सकाळी एक फेसबुक पोस्ट केली. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? याबाबत येत्या १२ डिसेंबरला म्हणजेच दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी ठरवणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले. पंकजांची फेसबुक पोस्टसध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. पंकजांच्या फेसबूक पोस्टमुळे पंकजा मुंडे भाजप सोडण्याच्या विचारात असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.

मात्र, पंकजा मुंडे या कधीही भाजप सोडण्याचा विचार करू शकत नाही. त्यांचे वडील गोपीनाथ मुंढे यांनी भाजप वाढवला, याचे भान त्यांना आहे. स्वतःशी चिंतन करणे कधीही चांगले असते. तेच त्या करत आहेत. त्यांच्या ‘फेसबुक पोस्ट’चा मीडियाने वाटेल तसा अर्थ लावला. तशा ते बातम्याही करू शकतात, असे मत पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले आहे.

तसेच दोन दिवस पंकजा मुंडे ह्या पक्ष बदलणार आहेत, आशा अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र आम्ही सर्व भाजप नेते पंकजा मुंडे यांच्या संपर्कात आहे. त्या असा कुठलाही निर्णय घेणार नाहीत. १२ डिसेंबर हा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा जयंतीचा दिवस आहे. या जयंतीला आम्ही सर्व भाजप नेते गोपीनाथ गडावर जात असतो. आयोजित कार्यक्रमात सहभागी होत असतो. त्यामुळे याही वर्षी आम्ही सार्वजण गोपीनाथ गडावर जाणार आहे. त्यामुळे पंकजा मुंडे पक्ष बदलणार आहेत, हे वृत्त केवळ अफवा आहे, असे पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या :

Loading...