fbpx

महादेव जानकर बारामतीतून निवडणूक लढवणार

महादेव जानकर

इंदापूर – राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे बारामतीतून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्याचे आदेश रासपच्या प्रदेश सरचिटणीस डॉ.अर्चना पाटील यांनी दिले आहेत.

लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रत्येक मतदार संघातील उमेदवार लोकसभेच्या तयारीला लागला आहे. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे त्या दृष्टीने तयारी करताना दिसत आहेत. इंदापूर तालुक्यातील रासप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बुथ यंत्रणा मजबूत करण्यावर भर द्यावा. त्यासोबतच ‘एक बुथ,दहा युथ’ ही संकल्पना राबून मतदारांसोबातचा जनसंपर्क कार्यकर्त्यांनी वाढवावा, असं डॉ.अर्चना पाटील यांनी म्हटलं आहे.

लोकसभेच्या २११४च्या निवडणुकीत महादेव जानकर यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात 4.5 लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून महादेव जानकर हे बारामतीतून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.