लक्ष्य २०१९ : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघाचा खासदार कोण?

टीम महाराष्ट्र देशा- आगामी लोकसभा निवडणूकीला सात-आठ महिने बाकी असले तरी सध्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजप कडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.

२०१४ लोकसभेभा निवडणूकीत शिवसेना-भाजप-स्वा. शेतकरी संघटना-राष्ट्रीय समाज पक्ष महायुती कडून सध्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्सविकास मंत्री महादेव जानकर निवडणूकीच्या रिंगणात उभे होते, त्यांच्या समोर सध्याच्या राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे होत्या. मोदी विरोधी लाट असूनही सुप्रिया सुळे यांनी आपला गड शाबूत ठेवला होता, त्यांनी महादेव जानकर यांचा पराभव केला होता. गेल्या बर्याच वर्षांपासून या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा बोलबाला आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीकडून खासदार सुप्रिया सुळे यांची उमेदवारी फिक्स झालेली आहे भाजप कडून सध्या चाचपणी सुरू असून सध्याचे पणन मंत्री महादेव जानकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.गेल्या लोकसभा निवडणूकीत झालेला पराभव भरून काढण्यासाठी आणि बारामती लोकसभा जिंकण्यासाठी भाजपला सक्षम उमेदवाराची गरज असून कुणाला उमेदवारी मिळणार हे लवकरच कळेल.

मागील निवडणुकीत सुळे यांना मताधिक्यासाठी नव्हे, तर विजयासाठीच झगडावे लागले. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांनी मोदी लाटेत त्यांना कडवी झुंज दिली. त्यामुळे सुळे यांचा ६९ हजार ७१९ मतांनी अगदी निसटता विजय झाला. सुळे यांना एकूण ५ लाख २१ हजार ५६२ मते मिळाली. जानकर यांना ४ लाख ५१ हजार ८४३ मते मिळाली. आम आदमी पक्षाचे उमेदवार सुरेश खोपडे हे २६ हजार ३९६ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

दरम्यान यापूर्वीच बारामतीत पत्रकारांशी संवाद साधताना ‘बारामतीचा उमेदवार मीच असेन आणि ही निवडणूक मीच जिंकेन,’ असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला होता. ‘लोकसभेच्या सहा व विधानसभेच्या पन्नास जागा भारतीय जनता पक्षाकडे मागणार आहे. त्यात तडजोड होईल. पण राष्ट्रवादी व काँग्रेसला सत्तेपासून रोखणे हेच ध्येय असून बारामतीचा उमेदवार मीच असेन असं ते म्हणाले होते.

मागील पराभवाचे उट्टे भरून काढण्यासाठी आणि बारामतीतून निवडून येण्यासाठी आपण तयार असल्याचेही मंत्री महादेव जानकर यांनी काही दिवसांपूर्वी संकेत दिलेले होते. आगामी लोकसभेला काही अवधी असला तरी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महादेव जानकरच उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

महादेव जानकरांचे रावसाहेब दानवे यांच्या चरणी लोटांगण

…तर महादेव जानकर यांना नंदीबैलावर फिरवू : बच्चू कडू