मोठी बातमी : नाराज महादेव जानकारांची रासप महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत ?

टीम महाराष्ट्र देशा;- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दौंड व जिंतूर मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षासाठी सोडण्यात आले होते. परंतु या मतदारसंघातील उमेदवारांना भाजपचे एबी फॉर्म दिले गेले. यामुळे नाराज झालेल्या महादेव जानकर यांनी मुंबईतील पक्षकार्यालयात पक्षाची तातडीची बैठक बोलवली आहे.

या बैठकीसाठी महादेव जानकर, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब दोडतल्ले यांच्यासह कार्यकारिणी सदस्य या बैठकीस उपस्थित आहेत. या घटनेसंदर्भात आढावा घेऊन काहीतरी निर्णय घेण्याच्या मानसिकतेत आता राष्ट्रीय समाज पक्ष असल्याची माहिती मिळते आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड. अमोल सातकर यांनी या बाबत माहिती दिली आहे.

दरम्यान,रासप महायुतीमधून बाहेर पडेल अशी देखील शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. याशिवाय इतर मित्रपक्षांच्या जागांवर देखील भाजपने स्वतःचे उमेदवार उभा करून मित्रपक्षांसोबत विश्वासघात केला आहे. मित्र पक्ष असतानाही ऐनवेळेस भाजपने राहुल कुल यांना एबी फॉर्म दिला, या कृतीने महादेव जानकर दुखावले असल्याची माहिती आहे. त्या मुळे आता सुरु असलेल्या तातडीच्या बैठकीत रासप काय निर्णय घेणार या कडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

महत्वाच्या बातम्या