fbpx

महायुतीत धुसफूस; सकारात्मक चर्चा न झाल्यास इतर पर्याय खुले आहेतचं : जानकर

mahadev jankar

टीम महाराष्ट्र देशा : ‘भाजपकडून  जागा वाटपात योग्य सन्मान मिळत नसल्याची भावना असल्याने छोट्या घटक पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपवर दबाव वाढवण्यासाठी छोट्या मित्र पक्षांची मोठ बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर युतीसंद्रभात दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे.

चौथ्या आघाडीची चर्चा तुर्तास नाही, युतीसोबत जाण्यास प्रथम प्राधान्य, सकारात्मक चर्चा न झाल्यास इतर पर्याय खुले आहेतचं  असं वक्तव्य दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केलं आहे. जानकर यांच्या या वक्तव्यामुळे रासप महायुतीतून बाहेर पडणार का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

दरम्यान, गिरीश महाजनांसोबत सकाळी सकारात्मक चर्चा झाली, रासप सोबतच्या जागावाटपावर युतीकडून लवकरच तोडगा निघेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.