पंकजाताई सोबत जाणार आणि भगवान गडावर भाषण करणारच – महादेव जानकर 

अहमदनगर : भगवानगडावर दसरा मेळावा होणार की नाही यावर पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका जाहीर केली नसली तरी दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी पंकजाताई बरोबर भगवान गडावर जाणार आणि भाषण करणारच असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

”वाद हे होतच असतात, आम्ही सामान्य समाजाचे प्रतिनिधी आहोत. त्यामुळे यावर्षीही पंकजाताईंसोबत भगवानगडावर जाऊन दर्शन घेणार”, असल्याचेही जानकर यांनी सांगितले आहे.

bagdure

पंकजा मुंडे यांनी जरी आपण मेळाव्याबद्दल संभ्रमात असल्याचे सांगितल असले तरी मुंडे समर्थक मात्र मेळावा घेण्यासाठी आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, गेल्यावर्षी भगवानगडावरील दसरा मेळाव्यातील महादेव जानकर यांच्या भाषणाने महाराष्ट्रभर वाद पेटला होता. त्यामुळे यंदाच्या या वादात महादेव जानकर यांच्या भूमीकेकडे सगळ्यांचच लक्ष लागलं होत.

You might also like
Comments
Loading...