fbpx

धनगर समाजाला आरक्षण मीच मिळवून देणार : महादेव जानकर

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे. त्यावर हे आरक्षण मीच मिळवून देणार असा दावा धनगर नेते आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला आहे. या आरक्षणाच्या मागणीची सुरवात आम्ही केली होती त्यामुळे याचा शेवट देखील आम्हीच करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सांगली लोकसभेचे भाजपाचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ सांगली दौऱ्यावर आले असता त्यांनी धनगर आरक्षणावर भाष्य केले. यावेळी जानकर म्हणाले की, धनगर समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा केंद्र पातळीवर असून याबाबत राज्य सरकारकडून देखील शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. धनगर समाजाला टिकणारे संवैधानिक पातळीवर टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

तसेच सध्या धनगर समाजाला आदिवासींप्रमाणे सामाजिक आरक्षण देण्यात आले आहे. राजकीय आरक्षण हे बाकी आहे. त्यामुळे धनगर आरक्षण देण्याची सुरुवात आम्ही केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेवटही आपण करणार, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.