fbpx

मी तिकीट मागणारा नाही, तिकीट देणारा आहे – महादेव जानकर

बारामती: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मित्रपक्ष रासपला एकही जागा न दिल्याने पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढल्याने ते युतीच्या प्रचारात सक्रीय झाले आहेत. बारामती लोकसभेच्या भाजप उमेदवार कांचन कुल यांना विजयी करण्यासाठी सर्व ताकद लावणार असल्याचं, जानकर यांनी सांगितले आहे, तसेच मी तिकीट मागणारा नाही, तर तिकीट देणारा असल्याचं त्यांनी सांगितले आहे. ते बारामती येथे पत्रकारांशी बोलत होते.

भाजपने भविष्यात देखील आम्हाला तिकीट दिले किंवा नाही तरी देखील त्यांच्यासोबतच राहणार आहे, दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नीला भाजपने उमेदवारी दिली असली तरी ते रासप सोडणार नाहीत, असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला आहे. बारामतीमध्ये पवारांचा पराभव होवू शकतो, हा आत्मविश्वास मीच निर्माण केल्याचं यावेळी जानकर म्हणाले.

शरद पवार यांच्याबद्दल आदर आहे, मात्र त्यांनी आजवर एकही धनगर व्यक्ती लोकसभेवर का पाठवला नाही, असा प्रश्न यावेळी त्यांनी विचारला आहे.