fbpx

…तर मी उद्धव ठाकरेंचेही पाय मी धरील : जानकर

mahadev-jankar-

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना-भाजप एकत्र राहावी ही रासपची पहिल्यापासूनची भूमिका आहे. त्यामुळे ‘शिवसेना आणि भाजप युती टिकवण्यासाठी मी उद्धव ठाकरेंचेही पाय धरील’, असं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलं.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. माझे आणि उद्धवसाहेबांचे चांगले सबंध आहेत. एकत्र राहण्यासाठी तशी मी मुख्यमंतत्र्यांना विनंती केली, तसं उद्धव ठाकरेंचे देखील पाय मी धरील. शिवसेना-भाजप एकत्र राहावी ही रासपची पहिल्यापासूनची भूमिका आहे .शिवसेना आणि भाजप युती टिकवण्यासाठी मी उद्धव ठाकरेंचेही पाय धरील. आम्हा भावाभावांमध्ये कितीही भांडणं झाली, तरी दुसऱ्याच्या परड्यात ओतणार नाही, आमच्याच आळीत कसं टाकलं जाईल, असा पर्यंत आम्ही करु.