धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर

टीम महाराष्ट्र देशा : धनगर आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे याबाबत राज्य सरकार पाठपुरावा करील, अशी ग्वाही राज्याचे पशु संवर्धन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली. तसेच या समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लागु करण्याचाही प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

अखेर मांजरम येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास मिळाले पशुधन विकास अधिकारी

Rohan Deshmukh

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाने तयार केला केलेला अहवाल राज्य सरकारला सादर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जानकर यांना धनगर आरक्षणाबाबत विचारले असता, त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे, ही शासनाची स्पष्ट भूमीका आहे. त्यानुसार शासन पावले उचलत असल्याचेही जानकर यांनी स्पष्ट केले. राज्यातील मासेमारीमध्ये गेल्या तीन वर्षात वाढ झाली असल्याचा दावाही त्यांनी केला.

मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे

Latur Advt
You might also like
Comments
Loading...