महादेव जानकारांनी केली देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात ‘ही’ मोठी भविष्यवाणी

पुणे : ‘राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व समाजाला न्याय देणारे आहेत. काही काळानंतर ते देशाचे पंतप्रधान बनतील,’ अशी भविष्यवाणी राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी केली आहे .’ब्राह्मण जागृती सेवा संघ’तर्फे संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले जानकर?
‘ब्राह्मण जात नसून एक व्यवस्था आहे. क्षेत्रात प्रावीण्य मिळविणे म्हणजे, त्यात तो ब्राह्मण बनतो. महात्मा गांधीच्या मागे गोपाळकृष्ण गोखले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे आंबेडकर नावाचे गुरुजी होते. महात्मा फुले यांना पहिला वाडा देणारे हे देखिल भिडे हे देखिल ब्राह्मण होते. या देशात एकात्मता राखण्याचे काम ब्राह्मण समाजाने केले आहे. या समाजाने भरपूर नेते तयार केले. आज आरक्षण आणि संरक्षण देणारे तुम्हालाच बनविले आहे. राज्याचे मुख्यमंत्री फक्त ब्राह्मण समाजाचे नाहीत. ते सर्व घटकांना न्याय देतात. काही काळानंतर ते देशाचा पंतप्रधान होतील’.

भाजपच्या खासदारांची संख्याही घटून शंभरीवर येईल : जयंत पाटील

You might also like
Comments
Loading...