अखेर नाराज जाणकरांचा हट्ट भाजपने पुरवला

मुंबई : राज्यात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होतं आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये रासपचे अध्यक्ष महादेव जाणकर यांचा देखील समावेश होता. सुरवातीपासूनच विधानपरिषदेच्या जागेसाठी आपल्याला रासपमधून उमेदवारी अर्ज दाखल करू द्यावा अशी मागणी जाणकर यांनी मुख्यमंत्र्यानंकडे केली होती. अखेर मुख्यमंत्र्यानी महादेव जाणकर यांचा हट्ट पुरवत त्यांना रासपमधून अर्ज भरण्यास परवानगी दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. धनगर आरक्षणावर सरकारकडून काही ठोस पावले उचलली जात नसल्याने जाणकर भाजपवर नाराज आहेत. जर विधानसभा किंवा लोकसभेसाठी भाजपकडून जागा लढवल्यास त्याचा फटका रासपला बसू शकतो असं जानकर यांना वाटत असल्यानेच त्यांनी रसपमधून विधानपरिषदेसाठी अर्ज भरल्याची चर्चा आहे.

Loading...

अखेर भाजपने महादेव जानकर यांचा हट्ट पुरवत त्यांना विधान परिषदेसाठी रासपमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची परवानगी दिली आज विधानपरिषदेच्या जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अखेर महादेव जानकर यांनी आपल्याचं पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

शेतकऱ्याचा मुलगा उद्योगपती झाला पाहिजे – महादेव जानकर

भाजप प्रदेश उपाध्यक्षांनी राज ठाकरेंविरुद्ध केली पोलिसात तक्रार

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले