ब्रेकिंग : भाजपने धोका केला, दोन्ही उमेदवार पक्षातून बेदखल – जानकर

टीम महाराष्ट्र देशा:- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दौंड व जिंतूर मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षासाठी सोडण्यात आले होते. परंतु या मतदारसंघातील उमेदवारांना भाजपचे एबी फॉर्म दिले गेले. यामुळे नाराज झालेल्या महादेव जानकर यांनी आज पत्रकार परिषद घेत सांगितले की या दोन्ही जागावरील उमेदवारांना आम्ही पक्षातून बेदखल केले आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्ष भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाही. आम्ही आमच्या चिन्हावर ठाम राहणार असून, आमच्या पक्षाला भाजप शिवसेनेने गंगाखेडच्या जागेसाठी मदत करावी, असे ही ते म्हणाले. तसेच राष्ट्रीय समाज पक्ष हा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेला मदत करणार असून आम्ही महायुतीतच राहणार आहोत असे त्यांनी सांगितले.