एकट्या समाजाच्या बळावर सत्तेत आलो नाही- महादेव जानकर

mahadev-jankar-

बारामती: धनगर समाजाचे नेतृत्व करण्याची इच्छा तरुणांना असली तरी केवळ आरक्षण – आरक्षण म्हणून चालणार नाही, असे महादेव जानकर यांनी स्पष्ट केले.

आम्ही सत्तेत आलो, ते काही एकट्या समाजाच्या बळावर नाही. जर कोणी केवळ आरक्षणामुळे महादेव जानकर सत्तेपर्यंत पोचले असे म्हणत असतील तर ते चुकीचे आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.

जानकर म्हणाले, धनगर आरक्षणासंदर्भात आरक्षण कमिटी नेमली आहे. तिचा अहवाल सकारात्मक येईल, तेव्हा सरकार निश्चित आरक्षण लागू करेल. केंद्र व राज्य सरकार सकारात्मक आहे.  सत्ताधाऱ्यांबाबत राग असू शकतो. मात्र, आरक्षणाबाबतची प्रक्रिया सुरू आहे. धनगर समाजाच्या युवकांनी संयमाने घ्यायला शिकावे, असे आवाहन जानकर यांनी केले. पत्रकार महेंद्र कांबळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन जानकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.