भाजपबरोबर येऊन भरडलो गेलो, महादेव जानकर महायुतीवर नाराज

टीम महाराष्ट्र देशा : भाजप – शिवसेना आणि मित्र पक्षांच्या महायुतीत मोठा तिढा निर्माण झाला आहे. भाजपचे मित्रपक्ष रासपने भाजपवर घणाघाती आरोप केले आहेत. भाजप बरोबर येऊन चांगलाचं फसलो असल्याचे वक्तव्य रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे. भाजपने बोलल्याप्रमाणे मित्रपक्षांना जागा न दिल्याने मित्रपक्ष नाराज आहेत. त्यातचं भाजप मित्र पक्षांना कमळ चिन्हावर लढण्यास सांगत असल्यने महादेव जानकर यांनी भाजप बरोबर येऊन पस्तावत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

जानकर पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रीय समाज पक्ष भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाही. आम्ही आमच्या चिन्हावर ठाम राहणार असून, आमच्या पक्षाला भाजप शिवसेनेने गंगाखेडच्या जागेसाठी मदत करावी, असेही ते म्हणाले. तसेच राष्ट्रीय समाज पक्ष हा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेला मदत करणार असून आम्ही महायुतीतच राहणार आहोत असे त्यांनी सांगितले आहे.

महायुतीकडून दौंड व जिंतूर मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षासाठी सोडण्यात आला आहे. परंतु या मतदारसंघातील उमेदवारांना भाजपचे एबी फॉर्म दिले गेले असून कमळ चिन्हावर लढण्याचा आदेश दिला आहे. भाजप श्रेष्ठींच्या आदेशानुसार दौंड मतदारसंघाचे उमेदवार राहुल कुल यांनी कमळ चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर जिंतूर मतदारसंघाच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांनीही कमळ चिन्ह स्वीकारले आहे. त्यामुळे महादेव जानकर यांनी यावर नाराजी व्यक्त करत बोर्डीकर आणि कुल यांना पक्षातून बेदखल केल्याचं म्हंटल आहे.

महत्वाच्या बातम्या