‘शरद पवारांनी कमरेखालची भाषा करणं योग्य नाही’

टीम महाराष्ट्र देशा:- लोकशाही आहे म्हणून विरोधकांनी काहीही बोलू नये. त्यांनी जबाबदारीनं बोलावं. काही शंका असेल तर नक्कीच विचारावं. आम्ही उत्तर देऊ. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे फक्त महाराष्ट्राचेच नाही तर देशाचेही नेते आहेत. त्यांनी कमरेखालची भाषा करणं योग्य नाही, अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. ते नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं कोणालाही मोठं हेऊ दिलं नाही. सगळं स्वतःच्या ताब्यात ठेवलं, असा आरोप जानकरांनी केला.तसेच ‘महात्मा फुले’ यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. तशी केंद्राला शिफारस केलीय, अशी माहिती जानकरांनी यावेळी दिली.

तसेच मी नाराज असतो तरी आता भाजपसोबत आहे. आमची परिस्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. पण आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. आम्हाला कोणतंही आश्वासन देण्यात आलेलं नाही. फक्त विकासाच्या मुद्द्यावर आम्ही महायुतीत आहोत, असं जानकर यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या