पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न रासप पूर्ण करेल : जानकर

टीम महाराष्ट्र देशा : शरद पवार यांची पंतप्रधान होण्याची इच्छा आहे. मात्र चार दोन खासदारांवर पंतप्रधानपद कसे शक्य आहे हो ?  पुढे मागे आमच्या पक्षाला पंतप्रधानपदाची संधी मिळेल, तेव्हा पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न रासप पूर्ण करेल अशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची खिल्ली पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी उडवली आहे.

रांजणगाव गणपती येथे जानकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना  पुढे मागे आमच्या पक्षाला पंतप्रधानपदाची संधी मिळेल, तेव्हा पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न रासप पूर्ण करेल असे म्हणत शरद पवार यांची खिल्ली उडवली.

आरक्षणासंदर्भात बोलताना जानकर म्हणाले, पवार शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेतात. मग त्यांनी समाजात दरी का निर्माण केली ? त्यांनी सहकार चळवळ मोडीत काढली. खासगी साखर कारखानदारी आणली. ज्यांच्या नावाचा जप पवार करतात त्या शाहू महाराजांनी १८०२ मध्ये सर्वप्रथम आरक्षण दिले. मात्र शाहू महाराजांच्या जातीला आरक्षण मिळण्यासाठी १५० वर्ष लागली. मराठा समाजाचे ११ मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही.विरोधकांनी मराठा ओबीसी, मराठा धनगर यांच्यात भांडणे लावली. मुख्यमंत्र्यांनी मात्र शांत डोक्याने कायद्याच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण दिले.