मी उत्तर द्यावं, एवढे धनंजय मुंडे मोठे नाहीत – महादेव जानकर

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यातील वाकयुद्ध संपूर्ण राज्याला माहित आहे. त्यातच धनंजय मुंडे यांच्याकडून धनगर आरक्षण मुद्द्यावरून महादेव जानकर यांना वारंवार लक्ष गेल जातं त्याचाचं धागा पकडत महादेव जानकर यांनी धनंजय मुंडेंवर तोफ डागली आहे.

“माझ्यावर टीका करणाऱ्या धनंजय मुंडे यांना मी उत्तर द्यावं, एवढे धनंजय मुंडे मोठे नाहीत. मला उत्तर द्यायचचं असेल तर मी शरद पवारांच्या टीकेला देईल”, असे वक्तव्य जानकरांनी केले आहे. तर “मी स्वतःच्या घरात राहतो, धनंजय मुंडे भाड्याच्या घरात राहतात”, असे वादग्रस्त विधान देखील जानकरांनी केले आहे.

Loading...

दरम्यान, धनगर आरक्षणाबाबत भाजप सरकारने धनगर समाजाला फसवलेलं नाही मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य पातळीवरचा होता, मात्र धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये पाठवण्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच धनगर समाजाला आरक्षण मिळवून देणार आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी दिली. सांगली येथे आयोजित राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर जानकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
रावसाहेब दानवेंचे जावई मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ