सध्याची युतीची परिस्थिती पाहता शिवसेनेने जास्त ताणू नये – महादेव जानकर

टीम महाराष्ट्र देशा :- राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. मात्र अजूनही कोणताही पक्ष सत्ता स्थापन करण्यास सक्षम नसल्याचे दिसत आहे. भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदाविषयी वाद आहे. अशातचं महायुतीचे घटक पक्ष असलेल्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेसाठी भाजपला निमंत्रित करा अशी मागणी केली आहे.

रासपचे नेते महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाईचे सरचिटणीस अविनाश महातेकर, रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त जागांवर विजय मिळाल्याने भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करावं, अशी मागणी केली.

याविषयी बोलताना रासपचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीला राज्यात कौल मिळून सुद्धा राज्यात युतीचा सरकार अद्याप स्थापन झाले नाही. आज महायुतीतल्या घटक पक्षांनी पुढाकार घेऊन राज्यपालांची भेट घेतली आणि भाजप हा राज्यातला मोठा पक्ष आहे म्हणून भाजपाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करावे अशी मागणी देखील मित्रपक्षांनी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

तसेच सध्याच्या युतीची परिस्थिती पाहता शिवसेनेने जास्त तानु नये जास्त ताणले की तुटणार असे मत देखील महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे.सध्या महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आज राज्यात सरकार असणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही राज्यपालांना तशी मागणी केली आहे असे मत देखील महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत जनतेने कोणत्याही पक्षाला बहुमत दिलेले नाही. त्यामुळे अनेक पक्षांना एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी लागणार आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात राज्यात सरकार स्थापन होणार आहे.

महत्वाच्या बातम्या