मुंबईला दूध कमी पडू देणार नाही ; आमचेही कार्यकर्ते मैदानात आहेत – जानकर

mahadev-jankar-

टीम महाराष्ट्र देशा : दूध उत्पादकांना पाच रुपये वाढीव दर देण्यात यावा तसेच ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केली जात आहे, या मागणीसाठी मुंबईची दूध कोंडी करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता. त्यानुसार रविवारी मध्यरात्रीपासूनच या आंदोलनाला सुरवात झाली आहे.

दरम्यान, ज्यांना आंदोलन करण्याची इच्छाच आहे, त्यांच्याबद्दल आम्ही काही सांगू नाही शकत. पण मुंबईला दूध पुरवठा कमी होणार नाही, संरक्षण दिलं जाईल, आमचेही कार्यकर्ते मैदानात आहेत. दूध उत्पादकांनी न घाबरता दूध पुरवठा करावा, तुम्हाला पोलीस संरक्षण दिलं जाईल, असं अजब विधान दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केलं आहे.

तर मागणी मान्य न झाल्याने राजू शेट्टी यांनी रविवारी रात्रीपासूनच दूध पुरवठा बंद आंदोलन पुकारलं असून राज्यभरातून या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसेच गालबोट देखील लागलं आहे.

पोलिसांनी बळाचा वापर केला, तर सहन करणार नाही – राजू शेट्टी