महाबळेश्वरचा अनुभव मुंबईतच, तापमानात घसरण

मुंबई  : मुंबईमध्ये तापमानाचा पारा घसरल्याने मुंबईकरांना इथेच महाबळेश्वरचा अनुभव येत आहे. उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडली असून तेथील थंड वारे मुंबईसह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात येऊन धडकले आहेत.

महाबळेश्वरचा पाराही १२ वर स्थिरावला असून विशेष म्हणजे यावेळी मुंबईचा पारा १३ अंश सेल्सियसपर्यंत घसरला आहे. हा गारठा आणखी दोन ते तीन दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. १९६२ मध्ये मुंबईत सर्वात कमी म्हणजे ७ . ४ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले गेले होते.

You might also like
Comments
Loading...