Sanjay Raut | मुंबई : भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाविकास आघाडीने राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सीमा समस्या, बेरोजगारी इत्यादी प्रश्नांवर शिंदे-फडणवीस सरकारला जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडी उद्या १७ डिसेंबरला महामोर्चा काढणार आहे. हा मोर्चा मुंबईतील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा असेल. मात्र या मोर्चाला सरकारकडून अद्याप परवानगी मिळाली नाही. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, “लोकशाही मार्गानं आंदोलन करणाऱ्यांवर बंदी आहे का? बंदी आली असेल तर जाहीर करा. पोलीस प्रशासन आणि सरकार यांच्याकडे रीतसर परवानगी मागितली आहे. कोणी पुढच्या दराने आणीबाणी आणली आहे का?. हा मोर्चा महाराष्ट्र प्रेमींचा आहे. याप्रकारे देवतांचा अपमान सुरू आहे डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान सुरू आहे. सावित्रीबाईंचा अपमान सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरू आहे. तसेच सीमा प्रश्नावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री पाहिजे ते बोलत आहेत. तसेच इथले उद्योग बाहेर पळवले जात आहेत. हा महाराष्ट्रावर अन्याय होत आहे. यासाठी हा मोर्चा आहे
सर्व महाराष्ट्र प्रेमींनी या मोर्चात सामील व्हावे.”
महाराष्ट्र प्रेमींच्या मोर्च्याला सरकार परवानगी नाकारत असेल तर या राज्यावर महाराष्ट्रद्रोही सरकार बसलेले आहे. सरकारमधील लोकांनी सुद्धा मोर्चात सामील झाले पाहिजे. हा मोर्चा महाराष्ट्रासाठी आहे. मोर्चाला परवानगी नाकारण्याची कोणी हिम्मत करेल, असे मला वाटत नाही. असे केले तर त्याचे फार वेगळे परिणाम महाराष्ट्रामध्ये उमटतील. मोर्चा जाहीर झालेला आहे आणि तो मोर्चा होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
अजित पवार काय म्हणाले –
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आणि महागाई, बेरोजगारी, महाराष्ट्रातील महापुरुषांचा सातत्याने होत असलेला अवमान या प्रश्नांवर महाविकास आघाडीने १७ डिसेंबर रोजी काढलेल्या मोर्चात महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने सामील व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. काल (गुरुवार) महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्यांचा पक्षाशी संबंध नाही, पण त्यांचा स्वाभिमानही दुखावला गेला आहे, असे सर्व लोक मोर्चात सहभागी होतील, असे ते म्हणाले.
या महाविकास आघाडीतर्फे काढण्यात येणाऱ्या हल्लाबोल मोर्चाला पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाही, असे अजित पवार म्हणाले. या मोर्चासाठी आम्ही परवानगी मागितली आहे. परवानगी हा मोठा मुद्दा नाही, परवानगी दिली जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत हल्लाबोल मोर्चा निघणार असल्याचे पवार म्हणाले. मोर्चा शांततेत काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- Gandhi Godse Ek Yudh | ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार राजकुमार संतोषीचा ‘गांधी-गोडसे एक युद्ध’
- Eknath Shinde | “महापुरुषांमध्ये साधू संत येत नाहीत का?”; शिंदे गटाचा महाविकास आघाडीला सवाल
- Sanjay Raut | लोकशाही मार्गानं आंदोलन करणाऱ्यांवर बंदी असेल तर जाहीर करा- संजय राऊत
- Vitamin Deficiency | ‘या’ विटामिनच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर वाढतात पांढरे डाग
- Sanjay Raut | “भाजपाच्या काही लोकांचे मेंदू किड्या-मुंग्यांचे”; चित्र वाघ यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा पलटवार