महामेट्रोला भाडेतत्वावर मोक्याच्या आठ जागा

pune metro

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात दापोडी ते पिंपरी या साडेसात किलोमीटरवर पुणे महामेट्रोचे काम सुरू आहे. महामेट्रोला महापालिकेच्या ताब्यातील मुख्यालयाच्या समोरील, वल्लभनगर, फुगेवाडी जकात नाक्याची, पालिका भवनासमोरील वाहनतळाची, मुख्यालयालगतची, दापोडी, फुगेवाडी आणि मोरवाडीतील या आठ जागा पुणे महामेट्रोला 30 वर्ष कालावधीसाठी भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत.

या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली. महामेट्रोने महापालिकेकडे जागेची मागणी केली होती. जागा हस्तांतरणासंदर्भात 9 जानेवारी 2018 रोजी महापालिकेत बैठक झाली होती. शहरात दापोडी ते पिंपरीदरम्यान काम सुरू आहे. महामेट्रोला यासाठी पालिकेच्या जागेची आवश्यकता आहे. दहा ठिकाणच्या जागेची मागणी पुणे महामेट्रोने पालिकेकडे केली आहे. पिंपरी पालिका प्रवेशद्वाराजवळील, भवनासमोरील वाहनतळाची, त्याच्या बाजूची, संत तुकारामनगर, नाशिक फाटा उड्डाण पूल आणि फुगेवाडी जकात नाका येथील जागेची महामेट्रोने पालिकेकडे मागणी केली आहे. अशा दहा ठिकाणाच्या जागा महामेट्रोला लागणार आहेत.

या जागा महामेट्रोला देण्याची मागणी मेट्रोच्या अधिका-यांनी पालिकेकडे केली आहे. यावर प्रशासनामध्ये चर्चा झाली. जागा देण्यास सकारात्मकता दर्शविली होती.Loading…
Loading...