fbpx

केरळमध्ये महापूर ; ओणम साजरा न करण्याचा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा – ओणम हा केरळचा मुख्य सण. देशभरात काय पण जगभरात पसरलेले मूळचे केरळचे लोकं मोठ्या उत्साहाने आपापल्या शहरात ओणम साजरा करतात. पुण्यातही ओणम सण मोठ्या उत्साहाने साजरा व्हायचा. येत्या 25 ऑगस्टला ओणम आहे. मात्र यावर्षी केरळमध्ये आलेल्या जलप्रलयांनातर या लोकांनी ओणम साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर यातून वाचणारे पैसे ते केरळला मदतस्वरूप पाठवणार आहेत. पुणे जिल्ह्यात मुळच्या केरळच्या असलेल्या लोकांची संख्या 4.5 लाख एवढी आहे. तसंच त्यांचा विविध भाग मिळून 30 संघटना आहेत.

धुंवाधार बरसणारा पाऊस आणि नद्यांना आलेला पूर यामुळे केरळमध्ये सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळजवळ संपूर्ण केरळमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात ३२४ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे २ लाख नागरिक बेघर झाले आहेत. गेल्या १०० वर्षांतील सर्वात भीषण महापुराचा सामना करणाऱ्या केरळला देशभरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. महाराष्ट्रामधूनही केरळा मदत केली जात आहे.

डॉ. दाभोळकरांची हत्या करणारा मास्टर माईंड शोधावा : डॉ. हमीद दाभोळकर