मध्यप्रदेश राज्य हे कॉंग्रेसचे एटीएम आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप जोरदार प्रचार करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी खुद्द देशभरातील राज्यांमध्ये जाऊन जनतेला संबोधित करत आहेत. आज नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर असून त्यांनी जुनागड येथे प्रचार सभा घेतली. कॉंग्रेस ने मध्यप्रदेश राज्याला एटीएम बनवले असून कॉंग्रेस पक्ष गरिबांचे अन्न देखील हिसकावून घेत आहे. असा घणाघात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसला लक्ष केले.

यावेळी मोदी भाषणाच्या सुरवातीला म्हणाले की, मी आज मागच्या ५ वर्षात केलेल्या कामाचा हिशोब देयला आलो आहे. तसेच पुढच्या ५ वर्षातील कामांचा जनतेकडून आदेश घ्यायला आलो आहे. पुढे मोदी म्हणाले की , आज तुम्हाला तुमच्या या चौकीदारचा अभिमान वाटत असेल करण अजून पर्यंत भ्रष्टाचाराचा एक ही डाग आमच्या सरकारवर नाही.

Loading...

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की , तुमचा हा चौकीदार हा सावध आहे. कॉंग्रेसच्या घोटाळ्यांमध्ये आता नवीन नाव जोडले गेले आहे. कॉंग्रेस गरीबांच अन्न हिसकावून घेत आहे. तसेच गर्भवती महिलांसाठी पाठवण्यात आलेल्या पैशांची लुट करत आहेत. मागच्या काही दिवसांपासून कॉंग्रेस नेत्यांकडे नोटांची पोती मिळत आहेत. मध्यप्रदेश मध्ये कॉंग्रेसचे सरकार येऊन ६ महिने होत नाहीत तर हा भ्रष्टाचार उघड झाला आहे. आता कॉंग्रेस ने मध्यप्रदेशला एटीएम बनवले आहे. त्यामुळेच कॉंग्रेस हा पक्ष देशाला लुटण्यासाठीच सत्तेवर येऊ पाहत आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले