स्थानिक तरुणांना रोजगार मिळण्यासाठी मध्यप्रदेश सरकारचा मोठा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा : देशात सध्या बेरोजगारीचा प्रश्न असतानाचं स्थानिक आणि भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न प्रत्येक राज्याला भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. खासगी क्षेत्रात नोकरीमध्ये राज्यातील तरुणांना तब्बल 70 टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय मध्यप्रदेश सरकार घेणार आहे. लवकरच याबाबत कायदा देखील केला जाणार आहे.

Loading...

मध्य प्रदेशच्या विधानसभेत आज एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री कमलनाथ यांनी याबाबतची माहिती दिली आहे.राज्यातील बेरोजगारी संपवण्यासाठी मध्य प्रदेश सरकार राज्यातील भूमिपूत्र तरुणांना खासगी नोकऱ्यांमध्ये 70 टक्के आरक्षण देणार असल्याचं राज्याचे जनसंपर्क मंत्री पीसी शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकार यासाठी लवकरच अध्यादेश आणणार आहे आणि हे आरक्षण देणारं मध्य प्रदेश पहिलं राज्य असेल, असे ते म्हणाले.

दरम्यान महाराष्ट्रात देखील बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक तरुण रोजगारासाठी वणवण फिरताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पर राज्यातून येणारे तरुण स्थानिकांचा रोजगार बळकावत आहेत.त्यामुळे भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न पुढे आणत अनेक वेळा मनसेने आंदोलन केली आहेत.त्यामुळे आता मध्य सरकारच्या या घोषणेनंतर मनसे काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं असेल.Loading…


Loading…

Loading...