मध्य प्रदेशात घोडेबाजार?; अन्य पक्षाचे आमदार संपर्कात : भाजप

'कहाणी अभी खतम नहीं हुई हैं मेरे दोस्त'

टीम महाराष्ट्र देशा- मध्य प्रदेशात काँग्रेसने दमदार कामगिरी करत भाजपाला धक्का दिला असला तरी कोणत्याही पक्षाला बहुमत मिळू शकलेले नाही. त्यामुळे आता अपक्ष, बसपा- सपा या पक्षाच्या आमदारांना महत्त्व प्राप्त झाले असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी सूचक विधान केले आहे. अपक्ष आणि अन्य पक्षाचे आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला असून लवकरच राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करु, असे त्यांनी सांगितले.

अंतिम निकालात काँग्रेसला सर्वाधिक 114 जागा मिळाल्या. तर भाजप 109, बसपा 2, सपा 1 आणि अपक्षांना 4 जागा मिळाल्या. त्यामुळे काँग्रेस राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे सत्ता स्थापन करण्यासाठी दावा केला असून भाजपही दावा करण्याच्या तयारीत आहे.

लोकसभेची सेमीफायनल- चंद्रशेखर राव हेच खरे किंग

दरम्यान,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले कमलनाथ यांनी सत्ता स्थापनेबाबत राज्यपालांना पत्र लिहिलं. आम्हाला सत्ता स्थापनेसाठी संधी दिली जावी, जेणेकरुन आम्ही विधानसभेत बहुमत सिद्ध करुन. आम्हाला अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे, असं कमलनाथ यांनी पत्रात लिहिलं आहे.

आता भाजपचे नवे नाव GTU गिरे तो भी टांगउपर

You might also like
Comments
Loading...