२४ तासानंतर निकाल जाहीर, मध्य प्रदेशात त्रिशंकू विधानसभा

कॉंग्रेस

टीम महाराष्ट्र देशा- मध्य प्रदेशमध्ये अखेर शिवराजसिंह चौहान यांना हादरा बसला असून या राज्यातील मतमोजणी जवळपास २४ तासांनी संपली. मध्य प्रदेशमधील २३० जागांपैकी काँग्रेसला ११४ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपाचा १०९ जागांवर विजय झाला असून समाजवादी पक्षाचा १, बहुजन समाज पक्षाचा २ आणि अपक्ष उमेदवारांचा ४ जागांवर विजय झाला आहे.

Loading...

15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला खाली खेचण्यात काँग्रेसला यश आलं.मात्र असे असले तरी बहुमतचा आकडा मात्र त्यांना गाठता आला नाही. मॅजिक फिगरपासून ते अवघे दोन आकडे दूर आहेत. पण हे दोनचं अंतर पार करण्यासाठी मध्य प्रदेशात ‘घोडेबाजाराला’ ऊत येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...