उर्मिला नंतर माधुरीच्या राजकारणात प्रवेशाची चर्चा… माधुरी म्हणाली…

टीम महाराष्ट्र देशा- अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्या राजकारणातील प्रवेशानंतर आता अभिनेत्री माधुरी दीक्षित ही सुद्धा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा सोशल मिडीयावर सुरु आहेत. माधुरी लोकसभा निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यावर माधुरीने अखेर मौन सोडलं आहे. ‘मी कोणत्याही पक्षातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही. मी निवडणूक लढवणार या निव्वळ अफवा आहेत,’ असं माधुरीनं स्पष्ट केलंय.

काँग्रेसमध्ये दोनच दिवसांपूर्वी प्रवेश करणारी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार आहे. भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टींविरोधात उर्मिलाची लढत असणार आहे. उर्मिलानंतर माधुरीच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरु झाली मात्रया बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे म्धुरीने स्पष्ट केले.

मी राजकारणात प्रवेश करणार ही निव्वळ अफवा आहे. मी कोणत्याच पक्षाकडून निवडणूक लढणार नाही. याबाबत मी पूर्वीच माझी भूमिका स्पष्ट केली आहे असं माधुरीने म्हटलं आहे. अतिशय नम्र शब्दात माधुरीने हे वृत्त फेटाळले आहे.

दरम्यान,मधुरी शिवाय अभिनेता सलमान खान आणि अभिनेता संजय दत्त हे देखील निवडणूक लढविणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.मात्र दोघांनीही या वृत्तांचे खंडन केले असून अश्या अफवा पसरवू नका असं देखील सांगितलं आहे.