पुणे भाजपच्या शहराध्यक्षपदी आ.माधुरी मिसाळ, आज होणार घोषणा ?

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पक्ष संघटनेत बदल केले जात आहेत. राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांनी वर्णी लागल्यानंतर आता शहर पातळीवर देखील पदाधिकाऱ्यांची निवड केली जात आहे. यामध्ये पर्वती विधानसभेच्या आमदार माधुरी मिसाळ यांची वर्णी शहराध्यक्षपदी लागणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

माधुरी मिसाळ या पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग दोनवेळा आमदार झाल्या आहेत. तसेच पुणे महापालिकेत त्या नगरसेविका देखील होत्या. दरम्यान, विद्यमान अध्यक्ष योगेश गोगावले यांना पक्षाकडून विधानसभेला संधी देण्यात येणार असल्याचं बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या