fbpx

माधुरीच्या ‘बकेट लिस्ट’चा ट्रेलर रिलीज

वेब टीम- अभिनेत्री माधुरी दीक्षितचा पहिला मराठी चित्रपट ‘बकेट लिस्ट’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. माधुरीने या चित्रपटात एका गृहिणीची भूमिका केली आहे. प्रत्येकाच्या मनात इच्छा आणि आकांक्षा असतात. याच इच्छा ‘बकेट लिस्ट’मधून माधुरी पूर्ण करताना दिसणार आहे.

‘बकेट लिस्ट- माझी, तुमची.. आपल्या सगळ्यांची’ अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा सिनेमा 25 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.